इंधन दरवाढ : चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचा जाहीर निषेध!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव प्रतिनिधी :- बाप्पाच्या आगमनालाच महागाईचे तोरण कशाला? सणासुदीच्या काळात खिसा का कापायचा? मोदी सरकारने ठरविले आहे का? अशा शब्दात चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने मोदी सरकार व देशाचे पेट्रोलियम मंत्री यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
पेट्रोल, डिझेलचे विघ्न आलेले आहे, बाप्पा ते दूर करा. १७ दिवस झाले मोदी सरकार देशातील जनतेची पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या माध्यमातून पिळवणूक करत आहे. इंधन दरवाढीची झळ आता प्रत्येकाच्या खिशाला बसत आहे. पेट्रोल – डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत
कुठे नेऊन ठेवला भारत देश आणि कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र ? ह्या चमकोगिरी बीजेपी सरकारने महागाईचा भडका, रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटामध्ये केलेली जबरदस्त वाढ, इंधन दरवाढीनंतर वाढलेले भाज्यांचे दर तसेच जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेली वाढ, सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याचा जबाब केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना विचारला असता ते म्हणतात इंधन दरवाढ रोखने आमच्या हातात नाही.
काँग्रेसच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर वाढले, तेव्हा जनता बोटं मोडायची, परंतु आता जनता गप्प का आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे बाप्पांच्या चरणी महागाईपासुन जनतेला वाचव! हिच इच्छा चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे मा. अध्यक्ष संदेश नवले यांनी व्यक्त केली.