न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- शिरगाव येथे साईबाबा मंदीरामध्ये जाऊन येतो, असे फिर्यादी यांचा मुलगा त्यांना म्हणाला. मंदीरामध्ये दर्शन घेऊन दुपारी ३.०० च्या दरम्यान आरोपी सुनेने फिर्यादीच्या मुलाला तिच्या शेतामध्ये घेऊन गेली.
अज्ञात कारणाने फिर्यादीच्या मुलाला आरोपीने दगडाने व इतर हत्याराने डोक्यात व गळयावर मारून त्याला जखमी करून जिवे ठार मारले. असा दाट संशय फिर्यादीला असल्याने आरोपीविरुद कायदेशिर कारवाई होण्यासाठी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ४) रोजी दुपारी ३.०० वाजताच्या दरम्यान ए. बिर्ला स्कुल समोर, संतोष बोडके यांच्या शेतात, गहुंजे, मावळ येथे घडला. याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी २५८/२०२३ भा.द.वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.












