न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२३) :- पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. १५ लाख ४० हजारांच्या २२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ओंकार दिलीप गवारे आणि महेश महादेव दनाने अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचं देखील समोर आले आहे.
दुचाकी चोरी करणारे आरोपी गवारे आणि दनाने हे थेरगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांना सापळा रचून वाकड पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी २२ गुन्हे केल्याचं कबूल केले. आरोपीकडून १५ लाख ४० हजारांच्या एकूण २२ दुचाकी वाकड पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, गुन्हे पोलिस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, चव्हाण, बीभीषण, इनामदार, काळे, गिरे, गवारी, साबळे, खेतल, अतिक शेख, शिमोन चांदेकर, तात्या शिंदे यांच्या पथकाने केली आहे.