न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२३) :- औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी येथील पेंटर जनरल या ट्रेडच्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा होण्यापूर्वीच टाटा मोटर्स पिंपरी येथे अप्रेंटीसशीप करिता निवड झाली आहे.
टाटा मोटर्स, पिंपरी या नामांकित कंपनीने शिकाऊ उमेदवारी २०२३, उमेदवार निवड प्रक्रियेत कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठिकाणी आयोजित लेखी परीक्षेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण विभाग मोरवाडी मधील पेंटर जनरल व्यवसायाच्या ११ प्रशिक्षणार्थ्यांची लेखा परीक्षा घेऊन प्रशिक्षणार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून अंतिम परीक्षा होण्यापूर्वीच अप्रेंटीसशीप करिता निवड केली आहे.
शिकाऊ उमेदवारीच्या काळात प्रशिक्षणार्थ्यांना ट्रेनिंग सोबतच दरमहा रक्कम रुपये १०,००० (र.रू. दहा हजार) विद्यावेतन तसेच कंपनीत कॅन्टीन सुविधा व कंपनीत येण्या-जाण्याकरीता बस सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.
शशिकांत पाटील, प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांची निवड झाल्याने समाधान व्यक्त केले. प्रकाश घोडके, गटनिदेशक व विकास क्षीरसागर, निदेशक यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित व मार्गदर्शीत केले.















