न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२३) :- निगडी येथील ओटा स्कीम परिसरात एका अज्ञात इसमाने रविवारी (दि. १८) सकाळी वाहनांची जाळपोळ केली. त्याने दोन ऑटो रिक्षा व एक स्कॉर्पिओ जाळली.
निगडी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक के. के. गिरि गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात कमलाप्पा जडगप्पा पुजारी (वय २७, दळवी नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अकस्मात जळीत घटनेची नोंद केली आहे. संबंधित परिसरात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालेले नाही. मात्र, संबंधित आरोपीचा पोलिस तपास करीत आहेत.















