न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- ‘स्पा’च्या नावाखाली स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी अवैधरित्या मुलींना जास्त पैशांचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडतात, अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली.
त्यानंतर अशा व्यक्तींची गोपनीय माहिती काढून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी (दि. २१) रोजी हिंजवडी परिसरातील Luminous SPA शॉप नं २०६, दुसरा मजला, सुरतवाला मार्क प्लाझा, हिंजवडी वाकड रोड, पुणे या ठिकाणी सापळा रचुन बनावट ग्राहकाला पाठवून अचानकपणे छापा टाकला.
आरोपी राहुल नवनाथ कांगणे याच्या ताब्यातून दोन पिडीत मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली. आरोपी विरुध्द हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुरनं ७४१ २०२३ भा दं वि क ३७० (३) सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशन करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे पोलीस अमलदार, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.