न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी प्रतिनिधी :- “मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन” हा आपल्या स्मृतीजणांना उजाळा देणारा दिवस आहे. आपल्या पूर्वजांनी मराठवाड्याला स्वतंत्र करण्यासाठी होतात्म्य पत्कारले, याची आठवण म्हणून संपूर्ण मराठवाड्यात १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
काळेवाडीतील मराठवाडा कॉलेज मध्ये पिं. चिं. मनपाचे सत्तारूढ़ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या शुभहस्ते झेडावंदन करण्यात आले होते.
या प्रसंगी स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, माधव मनोरे, प्राचार्य पाटील सर, गणेश ढाकणे सर, सुनिल काकडे, इंगवले साहेब तसेच शहरातील सर्व मराठवाडाप्रेमी नागरिक उपस्थित असे मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांनी सांगितले.