तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करा – शिवसेनेची मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक ९ मधील मासुळकर कॉलनी, नेहरुनगर, उदयमनगर परिसरात आरोग्याच्या तक्रारी निर्माण झालेल्या आहेत. दुषित हवामानामुळे साथीच्या रोगांना निमंत्रण मिळत असून आरोग्य यंत्रणा सुस्त आहे.
तसेच या परिसरात स्वाइन फ्लू, डेंगू, मलेरिया इ. सारख्या गंभीर आजारांनी नागरिक भयभीत असून, या आजारांबाबत जनजागृती करणारी यंत्रणा कोलमडलेली आहे.
शिवसेना भोसरी विधानसभा समन्वयक दत्तात्रय भालेराव यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क प्रभाग आरोग्य अधिकारी भोसले यांची भेट घेतली व त्यांना आरोग्य समस्येचे निवेदन दिले. आरोग्य अधिकारी भोसले यांनी भालेराव यांना ताबडतोब आरोग्य समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख प्रदिप चव्हाण, उपविभाग प्रमुख चंन्द्रशेखर कणसे, विपुल टेहरे आदी उपस्थित होते.
















