- मोरवाडी आयटीआयमध्ये ‘कॅंपस कनेक्ट’ चर्चासत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी व दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ‘कॅंपस कनेक्ट’ या उपक्रमांतर्गत डिक्की नेक्सजेन तर्फे उद्योजकता विकास या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी मैत्रीय कांबळे, नॅशनल हेड नेक्सजेन डिक्की, अविनाश जगताप (डिक्कीचे पश्चिम विभाग प्रमुख), कृणाल जगताप, सचिन दिगोलकर व गणेश शिंदे, कोअर कमिटी मेंबर्स उपस्थित होते.
अविनाश जगताप यांनी यावेळी डिक्कीची स्थापना, उद्दीष्ठे, डिक्की उद्योजकीय विषयांवर करीत असलेले कार्य याबाबत माहिती दिली. डिक्कीने घडविलेले एक उद्योजक कृणाल जगताप यांनी स्वतःचा उद्योजकीय प्रवास उलगडताना शिक्षण, नोकरी, व्यवसाय व उद्योजकता याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
मुख्य वक्त्या मैत्रिय कांबळे यांनी कोणता ही कोणताही उद्योग हा कामातील स्किल-कौशल्यावर पारंगत असणाऱ्या तंत्र कुशल कामगारावर अवलंबून असल्याने आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांनी उद्योजकीय मानसिकता रुजूवून कामगार होण्याऐवजी स्वतः उद्योजक होण्याचे आवाहन केले.
संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर जीवन ढेकळे यांनी सूत्रसंचालन केले. ओव्हाळ व रेंगडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.












