न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ एप्रिल) :- मावळ, शिरूर, पुणे आणि बारामती या चार लोकसभा मतदार संघांतील खासदारांमध्ये मावळचे श्रीरंग बारणे आणि बारामतीच्या सुप्रिया सुळे यांच्या कामाचा लेखाजोखा अव्वल असल्याची माहिती समोर आली आहे. ‘परिवर्तन’ या स्वयंसेवी संस्थेने तयार केलेल्या खासदारांच्या ‘रिपोर्ट कार्ड’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
खासदारांची लोकसभेतील एकूण उपस्थिती, त्यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, विविध विषय, प्रस्तावित कायदे आणि अहवाल यावरील चर्चामध्ये सहभाग घेणारे खासदार, स्वतंत्र विधेयके मांडणारे खासदार तसेच खासदार निधीचा सर्वाधिक वापर करणारे खासदार या निकषांवर हे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले आहे.
प्रकल्प प्रमुख अंकिता अभ्यंकर आणि परिवर्तन संस्थेचे कार्यकर्ते सायली दोडके, दीपक बाबर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही माहिती २३ मार्चपर्यंतच्या कामगिरीची आहे. परिवर्तनतर्फे बनवण्यात आलेले खासदारांचे रिपोर्ट कार्ड khasdar.info या संकेतस्थळावर सर्वाना पाहण्यासाठी उप










