- सामाजिक कार्यकर्त्या प्रियंकाताई सागर कोकणे यांचा वाढदिवसानिमित्त उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे आणि माजी स्विकृत नगरसेवक सागर खंडूशेठ कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या प्रियंकाताई सागर कोकणे यांच्या वतीने रहाटणीतील विमल गार्डनमध्ये रविवारी (दि. १३) रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सर्व आरोग्य तपासण्या आणि उपचार मोफत होणार आहेत. तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले असून प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिरास जनसेवा ब्लड बँक, पुणे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
आरोग्य शिबिरात दातांचे उपचार, दातदुखी, रूट कॅनल दातांसंबंधित इतर उपचार, कॅन्सर शस्त्रकिया उपचार व तपासणी, हृदय रोग, ओपन हार्ट सर्जरी (बायपास), लहान मुलांचे ओपन हार्ट सर्जरी, लहान मुलांचे हृदयाचे होल, बॉल बदलणे, एन्जोप्लास्टि, तसेच जनरल शस्त्रक्रिया, तोंडाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, जननेंद्रियाचा कॅन्सर ब्लड कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर लंग कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, लिव्हर व्यापी आणि सर्व प्रकारच्या कॅन्सर समस्या, घशाचा कॅन्सर, किडणी मुतखडा, मूत्राशयाचा कर्करोग, लहान मुलांचे लघवीचे आजार, किडनीशी संबंधित सर्व आजारवरील तपासण्या व उपचार मोफत करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महाआरोग्य शिबीरात सहभागी होत मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रियंकाताई सागर कोकणे यांनी केले आहे.















