न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२३) :- महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक संवर्गीय हक्क परिषदेच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी संजय जगदाळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना हक्क परिषदेचे प्रदेश संघटक शिवाजी खांडेकर यांनी नियुक्तीचे पत्र दिले.
यावेळी शिक्षकेतर संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शशिकांत जाधव, परशुराम कदम, अविनाश इंगवले, गणेश दुधे, शंतनु कांबळे, इस्माईल शेख यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रदेश संघटक शिवाजी खांडेकर म्हणाले की, लिपीक संवर्गीय हक्क परिषदेचे महत्व ओळखून आज राज्यातील शासकीय, निमशासकीय वर्गातील १३ लाखाच्या वर लिपीक संवर्ग हा या हक्क परिषदेशी जोडला गेलेला आहे. यासाठी परिषदेचे राज्य अध्यक्ष विजय बोरसे, प्रदेश सरचिटणीस उमाकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शन व प्रयत्नामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे लिपीक कर्मचारी सध्या या परिषदेशी जोडले जात आहेत. त्यामुळे ही परिषद राज्यात एक महत्वाचे संघटन म्हनून उदयास येत आहे. संजय जगदाळे यांच्या नियुक्तीने पिंपरी चिंचवड शहरातदेखील परिषदेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
नेहमीच राज्यातील प्रशासकीय कामकाजाचा डोलारा हा लिपीक संवर्गावर उभा आहे. यामुळेच कोणतेही काम आगोदर लिपीक वर्गावर लादले जाते व लिपीकही इमानेइतबारे ते काम प्रामाणिकपणे पुर्ण करत असतातच. पण असे असूनही अनेक समस्या, अनेक अडचणी या लिपीक संवर्गाच्या जैसे थेच आहेत. यात महानगरपालिकेचा लिपीक असो की की इतर स्थानिक संस्थेचे लिपीक असो. सर्वांच्या समस्यात दिवसेदिवस वाढ होतच आहे. या समस्या हा अन्याय दुर करायचा असेल आपला हक्का आपल्याला मिळवायचा असेल तर लिपीक संवर्गीय हक्क परिषदे शिवाय राज्यात पर्याय नाही. आज परिषदेचे प्रदेश अध्यक्ष विजय बोरसे, प्रदेश सरचिटणीस उमाकांत सुर्यवंशी, प्रदेश संघटक शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली निश्चितच लिपीक संवर्गाला न्याय मिळेल याची खात्री आहे. – संजय जगदाळे, नवनियुक्त अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीक संवर्गीय हक्क परिषद, पिंपरी चिंचवड…















