न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२३) :- अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान, दानशूर आणि मुत्सद्दी राज्यकर्त्या होत्या, त्यांनी आपल्या शासन काळात शेकडो लोकोपयोगी निर्णय घेतले आणि समाजसेवेचे व्रत अखेरपर्यंत चालू ठेवले, शिवाय त्या युद्धनिती निपुणही होत्या असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस अतिरिक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी अतिरिक्त आयुक्त जगताप बोलत होते
या कार्यक्रमास सांगवी रूग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ तृप्ती सागळे,आरोग्य वैद्यकीय कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक उद्यान अधिक्षक मंजुषा हिंगे, फार्मासिस्ट वसुधा पाटील आदी उपस्थित होत्या.
मोरवाडी चौक, पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आमदार उमा खापरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी खासदार अमर साबळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसदस्य शंकर जगताप, राजू दुर्गे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते दीपक भोजने, संतोष पांढरे, नवनाथ देवकाते, सुहास सामसे, दत्ता शेंडगे, लक्ष्मण रुपनवर, महावीर काळे उपस्थित होते.
तर सांगवी येथील कार्यक्रमात उल्हास जगताप यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसदस्य हर्षल ढोरे, संतोष कांबळे, माजी नगरसदस्या शारदा सोनवणे तसेच सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे,सुर्यकांत गोफणे, दादासाहेब देवकाते, छगन वाघमोडे, अभिमन्यू गाडेकर,काशिनाथ गिरगुणे, हरिश्चंद्र गायके उपस्थित होते.














