- दोन दिवसीय शिबीरामध्ये जमीन मालकांनी स्वखुशीने दिला ताबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२३) :- पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या दोन्ही बाजूस मंजुर विकास योजनेमधील १२ मी. सेवा रस्त्याचा ताबा घेण्यासाठी (दि. १७ आणि दि. १८) या दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
वाकड येथील कै. आबाजी भुमकर शाळा, ताथवडे आणि पुनावळेसाठी पुनावळे येथील पाण्याची टाकी येथील कार्यालय तसेच किवळे, रावेत, मामुर्डीसाठी श्री बापदेव प्राथमिक शाळा येथे गेले दोन दिवस सकाळी १०:०० पासून संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत जमीन मालक, विकसक, जागा ताब्यात देण्यासाठी उपस्थित होते.
नगररचना विभागाने तयार केलेला नकाशा पाहून आपली जागा रस्त्याच्या संपादनात येत असल्याची खात्री झाल्यानंतर कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करून जागेचा आगाऊ ताबा दिला. महानगरपालिकेच्या नगररचना विभाग व स्थापत्य विभागाने संयुक्तपणे “अ” व ” ब ” प्रपत्र जमीन मालकांना शिबिरामध्येच दिले. दोन दिवसांच्या शिबिरामध्ये वाकड गावच्या रस्त्याची लांबी ६५४ मी. व क्षेत्र ७६९८ चौ.मी., ताथवडे लांबी १०७० मी. क्षेत्र १२८१६ चौ.मी., पुनावळे लांबी १०६८ मी. क्षेत्र १२८४० चौ.मी., रावेत लांबी ८१८ मी. क्षेत्र ९८१६ चौ. मी., किवळे लांबी ७७७ मी. क्षेत्र ९३२४ चौ.मी.
दोन दिवसाच्या शिबिरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूची एकूण लांबी २१२२० मी. पैकी एकूण ४३८७ मी. व क्षेत्र ५२४९४ चौ.मी. इतके क्षेत्र टी.डी.आर./एफ.एस.आय. बदल्यात ताब्यात आले आहे. यापूर्वी ही काही क्षेत्र टी.डी.आर./एफ.एस.आय. च्या बदल्यात ताब्यात आले असून सद्यस्थितीत ६०% पेक्षा जास्त क्षेत्र महानगरपालिकेच्या ताब्यात आले आहे. उर्वरित क्षेत्रही लवकरच महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी जमीन मालकांनी दर्शविली आहे. काही कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर उर्वरित जमिनी महानगरपालिकेच्या ताब्यात मिळणार आहेत.
या दोन दिवसाच्या शिबिराचे आयोजन आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. त्यामध्ये उपसंचालक नगररचना प्रसाद गायकवाड, सहाय्यक संचालक नगररचना संदेश खडतरे, उपअभियंता उमेश मोने, राजकुमार सूर्यवंशी, सुभाष काळे, अशोक कुटे, विजय भोसले, कनिष्ट अभियंता अक्षय कुंभार, संजय बंडगर, राजदीप तायडे, अनिल इदे, अमित पवार, रुपेश भूराने, प्रविण माळी, अमोल पाचंगणे, रुपकचंद देशमाने, सचितानंद महाजन, प्रणिता पिंजण, रीनल तिरके, कुलकर्णी, सर्व्हेअर संतोष कदम, हनुमंत टिळेकर, नितीन जवळकर, मुकुंद क्षीरसागर या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.


















