न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२३) :- संगणमत आणि कट रचत फिर्यादीला आरोपींनी बाबा रिसायकलींग या प्लॉस्टीक प्लॉन्टमध्ये खुप आर्थिक फायदा होत असल्याचे आमिष दाखविले. जास्त परताव्याचे आमिष दाखवुन ३०,००००० रुपयांची गुंतवणुक करण्यास भाग पाडले. न्यासभंग करुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
चेतन दशरथ गिरी यांनी आरोपी अंकित केतन सावला (रा. मोई, ता. खेड), महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी ४३५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, १२० (ब) प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोनि तांबे पुढील तपास करीत आहेत.















