- कासारवाडीत मेहंदी स्पर्धेस महिलांचा उस्फुर्त सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- मा. नगरसेविका आशा धायगुडे शेंडगे आणि आदित्य बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी सणानिमित्त कासारवाडीत मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आले होते.
या स्पर्धेसाठी तेरा वर्षाखलील व खुला गट असे विभाजन करण्यात आले होते. साधारण १४३ महिला व मुलींनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत सहभागी महिलांनी सणांचे महत्त्व, वृक्षतोड, बेटी बचाव आदी संवेदनशील विषयांवर मेहंदी रेखाटली होती. त्यातील एक स्पर्धकाने व्यक्तिचित्र देखील रेखाटले होते.
“संस्कृती व परंपरा जोपासण्याबरोबरच महिलांच्या कला गुणांना वाव देण्याच्यादृष्टीने व्यासपीठ उपलब्ध करत असते, ” असे मत आशा धायगुडे शेंडग यांनी व्यक्त केले. या स्पर्धेसाठी नितु नानक, काजल मायरमनी, पुष्पलता वायाल व वर्षा राऊत यांनी परिक्षकांची भूमिका पार पाडली.















