न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२३) :- एकाच वाहनातून आलेल्या मित्राने त्याच्या मित्राची गोळ्या झाडून हत्या केली आहे. हा प्रकार औंध- रावेत बीआरटी मार्गावर असलेल्या सांगवीतील रक्षक चौकात सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.
सागर शिंदे असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या गोळ्यांच्या दोन पुंगळ्या मिळालेल्या आहेत. दरम्यान हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार योगेश जगताप याला गुंड विरोधी पथकाने अवघ्या काही तासातच जेरबंद केलं आहे.
आपापसात झालेल्या वादातून सागरची गोळ्या झाडून हत्या केली असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता. दरम्यान मयत इसमावर खुनाचा दाखल आहे.












