न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा पवार पिंपरी चिंचवड शहरात उद्या शुक्रवारी (दि. २४) रोजी प्रथमच येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत उद्या “कार्यकर्ता मेळावा” तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान त्यांचा पिंपरी, चिंचवड, वाल्हेकरवाडी आणि रावेत परिसरात स्वागत आणि सत्कार होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता महापालिकेत त्यांची अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात दुपारी ०२:०० वाजता अजितदादा कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी शहरातील आजी,माजी आमदार, जेष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या ‘कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रमास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.












