न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सातारा : गणपती विसर्जनात डीजे लावला तर कारवाई होणारच, असं विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगीतलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दोन बेस, दोन टॉप आणि मिक्सरलाही परवानगी दिली जाणार नाही. ही सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केल्यास जागेवरच जप्त करुन मंडळावर तत्काळ गु्न्हे दाखल केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उदयनराजेंनी साउंड सिस्टीम लावण्याची भूमिका जाहीर केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर काय कारवाई करणार? या प्रश्नावर महानिरीक्षक नांगरे-पाटील म्हणाले, ‘ लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना मांडण्याचे काम करतात. मात्र पोलिसांना कायद्याचे पालन करावे लागतेच..