न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- आज सेवानिवृत्त होणा-या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी कार्यालयीन कामकाजाचा अखेरचा दिवस असून उद्यापासून नव्या आयुष्याची अनोखी सुरुवात होणार असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त करुन सेवानिवृत्त कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी आरोग्यदायी शुभेच्छाही दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑगस्ट २०२३ अखेर सेवानिवृत्त होणा-या १७ कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार, चारुशीला जोशी तसेच विविध विभागातील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे ऑगस्ट २०२३ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये लेखाधिकारी वसंत उगले, सहाय्यक आरोग्याधिकारी बाबासाहेब कांबळे, कार्यालय अधिक्षक नरेशकुमार इदनानी, लेखापाल विशाखा ठोंबरे, सुनिल कुर्तकोटी, स्टाफनर्स सिंड्रेला ठोंबरे, सहाय्यक शिक्षक जयवंत सुपेकर, उपशिक्षक वनिता भांगे, आरोग्य निरिक्षक संजय मानमोडे, वाहनचालक चंद्रकांत वाघुले, मुकादम बाळासाहेब झेंडे, मजूर कैलास माने, बाळकृष्ण मोरे, दिपक गायकवाड, सफाई कामगार ज्ञानेश्वर जाधव, पुतळाबाई दाखले यांचा समावेश आहे तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचा-यांमध्ये सफाई सेवक राजू मानकर यांचा समावेश आहे.
सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी २५ ते ३० वर्षे महापालिकेत उत्तम सेवा केली आहे. महानगरपालिकेस आज मिळत असलेले विविध पुरस्कार, सन्मान त्यांच्या उत्तम सेवेचे फलीत आहे असे अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.












