न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑगस्ट २०२३) :- भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या जनस्वराज्य यात्रेचे पिंपळे सौदागर येथे नुकतेच आगमन झाले होते. त्यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भिसे यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांचा सत्कार केला.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भिसे, भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस दीपक नागरगोजे, उद्योजक संभाजी नागरगोजे, उद्योजक मयूर गवारे, राष्ट्रीय समाज पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे माजी अध्यक्ष महानवर, विजय भांगरे व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.












