न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२३) :- जालना जिल्हा येथील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करीत हवेत गोळीबार केला आहे.
त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली उद्या रविवारी (दि. ३) रोजी सकाळी ११ वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे आंदोलन करण्यात येणार आहे.















