न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२३) :- शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले तसेच कर्जामुळे एका तरुणाने राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. चऱ्होली फाटा येथे शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
समाधान दत्तात्रय आहेर (३४, रा. चऱ्होली फाटा, मूळ रा. बार्शी, सोलापूर), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान आहेर यांनी राहत्या घराच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. यात गंभीर जखमी झाला. याबाबत माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समाधान यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले. समाधान आहेर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. कर्जामुळे मी आत्महत्या करीत आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात लिहिले आहे.















