न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी प्रतिनिधी :- दोन अल्पवयीन मुलींवर साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांनी बलात्कार केल्याची घटना रविवार दिनांक १६ रोजी हिंजवडी परिसरात घडली. यात एका मुलीचा बुधवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, कविता खराडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, दिपाली देशमुख, पौर्णिमा पालेकर, शिल्पा बिडकर, आशा शिंदे, शमा कोरबू, मिना कोरडे, सुप्रिया पवार , सविता धुमाळ, मंगल ढगे, निर्मला माने, विजया काटे, बाळासाहेब पिल्लेवार, सर्जेराव जगताप, यतिन पारेख, रंजना कराळे, हमीद शेख, विजय दळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.