न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी प्रतिनिधी :- निगडी येथे अमित गोरखे युथ फाऊंडेशनच्या वतीने ‘स्मार्ट सिटी – स्मार्ट स्टार्टअप’ या उद्योजगता शिबिरांतर्गत व्यवसाय तज्ञ चेतना पवार यांचे ‘ऑनलाईन व्यवसाय’ या मागर्दर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित गोरखे उपस्थित होते.
ऑनलाईन व्यवसायाचे महत्व पटवून देताना चेतना पवार म्हणाल्या, व्यवसायाकरिता अजूनही ‘ओल्ड सिस्टीम’ राबविणाय्रा उद्योजकांपुढे स्मार्ट आणि वेगवान ‘ई-कॉमर्स’ उद्योगाने मोठे आव्हान निर्माण केले आहे त्यामुळे पारंपरिक उद्योग तोट्यात जात आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी अनेक उद्योजकांनी आपला उद्योग डिजिटल स्वरूपात राबवण्याचा निर्णय घेतला असून इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन वेबसाइटच्या मदतीने व्यवसायविस्तार केला जात आहे.
अनेक उद्योजक व नवउद्योजकांनी ऑनलाईन वेबसाईट तयार करून आपले प्रॉडक्ट्स इंटरनेटच्या माध्यमातून इ-ग्राहकांपर्यंत पोहोचवावीत. याकरिता जर तुम्हाला कोणत्याही उत्पादनाची विक्री करायची असेल, तर कमी खर्चांत सर्वत्र पोहोचण्यासाठी वेबसाइटची मदत होऊ शकते. मात्र, ई-कॉमर्स वेबसाइट बनवणे आणि तिचा मेंटेनन्स करणे या अतिशय खर्चिक बाबी आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही लहान उद्योजक असाल, तर आधीपासूनच उपलब्ध असणाऱ्या ‘ई-कॉमर्स’ वेबसाइटच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री करू शकता किंवा स्वतःच्या वेबसाइटवर विक्री करू शकता.
यावेळी कार्यक्रमास आयोजक अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे, रवी घाटे व नॉव्हेल इंस्टीट्युटचे कर्मचारी उपस्थित होते.
















