न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२३) :- वाकड येथे नुकत्याच पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात आकुर्डी येथील श्री. सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील शिक्षिका शितल भानुदास औटी यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्लोबल स्काॅलर फाऊंडेशनच्या वतीने ‘डायमंड ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पद्मश्री गिरीश प्रभुणे पद्मश्री यांचे हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष दाभाडे सर व मुख्याध्यापक माळे सर यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले, असे शाळेच्या शिक्षिका शितल औटी यांनी सांगितले.















