न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- श्री द्वारकाधीश सेवा मंडळ ट्रस्ट व गरवी गुजराथी समाजाच्या वतीने श्री कृष्ण जन्मोत्सव सालाबादाप्रमाणे पारंपारिकरित्या साजरा करण्यात आला. यावेळी ज्ञानदीप भजनी मंडळ, वैदही भजनी मंडळ, नवदुर्गा भजनी मंडळ यांनी भक्तिमय वातावरण निर्माण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी रिचा पटेल व अभिषेक पटेल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. द्वारकाधीश सेवा मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षा किरण पटेल यांच्यासमवेत इतर महिलांनी भजन, कीर्तन, रास गरबाचे सादरीकरण केले.
यावेळी पूनम पटेल, हेमलता पटेल, भानू मकवाना, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भानू चुडासमा, नेहल मकवाना, लीला काटेलीया, ज्योत्स्ना रामानी, समजू हिरानी, एकता जानी, सोनल पटेल, दिनू सिद्धपुरा, लीलावती सिद्धपुरा, जूली तन्ना यांच्यासमवेत अनेक भाविक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे संयोजन मुकेश चुडासमा, एल.जी. पटेल, जिग्नेश पटेल, स्वप्नील भागवत, राजेंद्र बाबर, ओम पळसकर, विराज चुडासमा, रमेश चुडासमा, करण चुडासमा, याग्निक काटेलीया, हार्दिक जानी, नितेश मकवाना, नयन तन्ना, अमित मकवाना, सिद्धार्थ शिंदे, विजय मानकीकर, हेमांशु पंखावाला, जितु रामानी व इतर कार्यकर्त्यांनी केले.















