- ढोल ताशा पथकानेही दहीहंडी उत्सवात भरला रंग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२३) :- निगडी प्राधिकरणातील से. नं. २६ मध्ये स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस नंदकुमार डेरे यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवाला सायंकाळी सातच्या सुमारास सुरुवात झाली.
मर्दानी खेळ आणि विद्युत रोषणाई तसेच डीजेच्या तालावर तरुणांनी थिरकण्याचा आनंद घेतला. आवर्तन ढोल ताशा पथकाने दहीहंडी उत्सवात रंग भरला. गोविंदा पथकांनी सलामी देत शेवटच्या क्षणी दहीहंडी फोडली.
यावेळी सहभागी गोविंदा पथकांना बक्षीसे देण्यात आली. मान्यवरांनीदेखील या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. परिसरातील नागरिकांनी दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे उत्साहात चांगलीच भर पडली. स्वामी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठे परिश्रम घेतले, अशी माहिती आयोजकांनी दिली.















