- मा. स्वीकृत सदस्य सागर कोकणे यांची पालिका प्रशासनाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२३) :- प्रभाग क्र २७ रहाटणीमधील श्री काळभैरवनाथ घाट दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी ‘ड’ प्रभागाचे मा. स्वीकृत सदस्य सागर कोकणे यांनी महापालिकेच्या ‘ग’ प्रभाग अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी येथील श्री काळभैरवनाथ घाटाची ड्रेनेजच्या कामामुळे अतिशय दुरावस्था झाली आहे. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गणेश विसर्जना दरम्यान येणाऱ्या हजारो गणेशभक्तांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. होणारी गैरसोय लक्षात घेता लवकरात लवकर घाट दुरूस्त करून घेण्यात यावा, असे या निवेदनात सागर कोकणे यांनी म्हटले आहे.

















