न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२३) :- पिंपळे सौदागर येथील विश्वशांती कॉलनीमध्ये उघड्यावरील केबलचा धक्का लागून तीन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. तसेच मेंढपाळ थोडक्यात बचावला.
मेंढ्याऐवजी एखादा विद्यार्थी किंवा मनुष्य असता तर महावितरण विभागाने जबाबदारी घेतली असती का? असा सवाल शहर राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे शहराध्यक्ष भाई विशाल जाधव यांनी महावितरणला केला आहे.
सातत्याने अशा घटना घडत असताना तुमचा विभाग असंवेदनशील झाला आहे. महावितरण यावर लवकर तोडगा काढत नाही. भटक्या विमुक्त समाजातील मेंढपाळ यांना लवकरात लवकर झालेल्या नुकसानाची भरपाई त्वरित द्यावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाई विशाल जाधव यांनी दिला आहे.


















