- मा. स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२३) :- गणेशोत्सव निमित्ताने आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने व आकुर्डी हाॅस्पीटल यांच्या सहकार्याने आज बुधवारी कुदळवाडी मनपा शाळा येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप करण्यात आले.
वेळच्यावेळी आरोग्याची तपासणी करणे काळजी गरज आहे. मात्र, महागाईच्या काळात तपासणीसाठी लागणारा खर्च सामान्य माणसाला परवडणारा नाही. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक बांधीलकी जपत दिनेश यादव मित्र परिवारच्या वतीने व आकुर्डी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून कुदळवाडी मनपा शाळा येथे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून २०० रुग्णांना रक्तदाब, वजन, शुगर, एचबी, सीबीसी, डब्ल्यू बीसी थायरॉईड, ईसीजी, हृदयरोग व स्त्रियांचे विकार, दातांची व डोळ्यांची तपासणी करून मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी आकुर्डी हाॅस्पीटल येथे पाठविण्यात आले. त्यांचे मोफत आभा कार्डही काढण्यात आले आहे.















