- नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासकांचा इशारा..
- गरज भासल्यास मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्षाशी साधा संपर्क…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२३) :- शहरात सध्या पाऊस सुरू असून पवना धरण क्षेत्रात तसेच शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. शिवाय पवना धरणातून पाण्याचा विसर्ग देखील केला जात असतो. अशा परिस्थितीत नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेता वीजनिर्मिती गृहाद्वारे पवना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्याबद्दल पवना धरण नियंत्रण कक्षाद्वारे पूर्वसुचना दिली जाते. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, पावसामुळे तसेच विविध प्रवाहातून थेट नदीपात्रात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाल्यास आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते, यासाठी महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.
नदीकाठच्या नागरिकांनी आपल्या वस्तू तसेच जनावरांची काळजी घ्यावी आणि कोणीही नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष सुरु आहे. शिवाय महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष असून सर्व कक्ष २४ X ७ कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
महत्वाचे दूरध्वनी क्रमांक
मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष- ०२०- २८३३११११ / ६७३३११११
अग्निशमन केंद्रांचे संपर्क क्रमांक
| अग्निशमन केंद्राचे नांव | पत्ता | दुरध्वनी क्रमांक |
| जन.अरुणकुमार वैद्य मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी | संत तुकाराम नगर,
पिंपरी |
२७४२३३३३
२७४२२४०५ ९९२२५०१४७५ |
| उप अग्निशमन केंद्र, भोसरी | लांडेवाडी, भोसरी | ८६६९६९२१०१
९९२२५०१४७६ |
| उप अग्निशमन केंद्र, प्राधिकरण | सें.क्र २३ प्राधिकरण,
निगडी |
२७६५२०६६
९९२२५०१४७७ |
| उप अग्निशमन केंद्र, रहाटणी | स.नं. १, रहाटणी | ८६६९६९३१०१
९९२२५०१४७८ |
| उप अग्निशमन केंद्र, तळवडे | आयटी पार्क जवळ, लक्ष्मी नगर, तळवडे | २७६९०१०१
९५५२५२३१०१ |
| उप अग्निशमन केंद्र,
चिखली |
जाधववाडी, चिखली | २७४९४८४९
८६६९६९४१०१ |















