न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२३) :- मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीचे कामकाज शुक्रवारी (दि. २९) बंद राहणार आहे. अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हे काम कामकाज बंद असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी दिली.
गुरूवारी (दि. २८) शुक्रवारी (दि. १९) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड येथील फळे, भाजीपाला बाजार, फूलबाजार तसेच खडकी उपबाजार, श्री नागेश्वर महाराज उपबाजार मोशी व मांजरी उपबाजार बंद राहणार असल्याचे काळभोर यांनी सांगितले.















