- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची पालिका प्रशासनाला सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२३) :- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका प्रशासन सोबत देवी आई माता व दत्त मंदिर विसर्जन घाटाची पाहणी केली व व विसर्जन घाट या ठिकाणी केलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेतला.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रशासनासोबत विसर्जन घाटावर गणपती बापाच्या विसर्जनासाठी बनविण्यात आलेल्या कुत्रीम हौदाची पाहणी केली तसेच गणपती मूर्ती संकलनासाठी केलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतला व गणेश भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिले आहे.
पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर विसर्जन घाट याठिकाणी गणपती याठिकाणी गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे . नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते , पालिका प्रशासन सकाळ पासूनच घाटावर उपस्थित आहेत आणि विसर्जन दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्षता घेत आहेत .
आज अनंत चतुर्दशी , आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस . दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर आज बाप्पा आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहेत परंतु पुढच्या वर्षी लवकर येतील हि खात्री देऊन …. गणेश चतुर्थीला सुरु झालेला हा उत्सव आज अनंत चतुर्दशी रोजी बाप्पाच्या विसर्जनाने संपणार आहे. गणपती मूर्ती विसर्जनासाठी गणेश भक्त ढोल- ताशांसह बाप्पाची मिरवणूक काढतात आणि विसर्जनाच्या वेळी भक्तांकडून गणपती बाप्पाला मनोभावे निरोप दिला जातो.
आज पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळे , घरगुती घरातील गणपती यांचे विसर्जन अति उत्साहात पार पडत आहे. यावेळी पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्त आरोग्य यशवंत डांगे, कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्थापत्य उपअभियंता सुनील नरोटे, ‘ड’ प्रभाग अधिकारी किरण कुमार मोरे, सहाय्य आरोग्य अधिकारी महेश आढाव, कनिष्ठ अभियंता प्राजक्ता गव्हाणे, आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.












