- खुनाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना अखेर यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२३) :- हॉटेल-बांधकाम व्यावसायिक विजय ढुमे यांचा शुक्रवारी (दि,.२९) रोजी सायंकाळी वडगाव बुद्रुक येथील क्वॉलिटी लॉजमधून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी लोखंडी सळई आणि लाकडी, लोखंडी दांडक्याने हल्ला करत खून केला होता. विजय ढुमे यांच्या खुनाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना अखेर यश मिळाले आहे.
ढूमेचा खून अनैतिक संबंधातून झाला असून सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडून विजयचा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला होता. सिंहगड रोड पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, धनकवडी, इंदापूर, पिंपरी चिंचवड मधून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे
हॉटेल वादातून ढुमे यांच्यावर यापूर्वी एक गुन्हा देखील दाखल झाला होता. विजय हा निवृत्त पोलिसाचा मुलगा होता. त्याचे वडिल पुणे शहर पोलीस दलात गुन्हेशाखा, सर्व्हेलन्स विभाग आणि निवृत्ती वेळी निगडी वाहतूक विभागात कार्यरत होते. सासवडनजीक असलेल्या ढुमेवाडी येथील ढुमे हे मुळचे रहिवासी होते. मागील ३० वर्षांपासून हे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते.