न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२३) :- भाडे तत्वावर घेतलेल्या गोडावूनमध्ये फिर्यादी फर्निचरचे काम करत होते. दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या होम फर्निचर दुकानाच्या बाजुने गोडावुनकडे जात असताना आरोपी व त्यांचा मित्र गोडवुन समोर दारू पित असताना त्यांना दिसला. त्यावेळी फिर्यादी त्यांना येथे दारु पिऊ नका, असे म्हणाले. त्यावेळी आरोपी ‘तु मला येथे दारु पिवु नका, असे बोलणारा कोण आहेस? असे फिर्यादीला म्हणाला. फिर्यादीच्या कानशिलात मारुन शिवीगाळ करुन बाचाबाची केली. त्यानंतर फिर्यादी त्यांच्या गोडावूनमध्ये काम करत असताना आरोपी यांनी बेकायदेशिर जमाव जमवून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या गोडाउनमध्ये जावुन फिर्यादी यांना रॉडने व लाकडी दांडक्याने व लाथाबुक्याने मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी यांच्या डोक्याला, हाताला व अंगावर इतर ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १) रोजी सकाळी १०.१५ ते १०.४५ च्या सुमारास मंगेश कस्पटे यांच्या गोडावूनसमोर तसेच फिर्यादी यांच्या गोडावूनमध्ये मानकर चौक, वाकड येथे घडला.
फिर्यादी मो. शाहजाद मो शफिक अन्सारी यांनी आरोपी १) मंगेश कस्पटे, २) अभिषेक कस्पटे, ३) जयेश कस्पटे, ४) दत्ता पाटील, ५) बालवडकर ६) पवन इतर अनोळखी २ ते ३ इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात पोलिसांनी ९५०/२०२३ भा.द.वि.क. ३०७, ३२४, ३२३, ५०६, ३४, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४(२५) म.पो.का.क. ३७ (१) (३)/१३५ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी ०२ आणि ०६ अटक आहेत. पुढील तपास पोऊपनि मेटे हे करीत आहेत.