न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२३) :- बाणेर स्मशानभूमी समोरून मुख्य रस्ता आणि गावात जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने डांबरीकरण न करता ‘पेव्हिंग ब्लॉक’ बसविले आहेत.
दरम्यान रस्ता खचल्यामुळे एकीकडे चढ तर दुसरीकडे उतार झाला आहे. उताराच्या बाजूकडे पाणी साचले असून जाता येता नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. परंतु महापालिका प्रशासनाला याबाबत कसलेही गांभीर्य नाही.
येत्या दोन दिवसात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही, तर रयत स्वाभिमानी संघटना या रस्त्यात बसून आंदोलन करेल, असा इशारा प्रमुख संघटक ऋषिकेश कानवटे यांनी पालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.













