न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन व ईशा नेत्रालय यांच्या वतीने (दि. ४) रोजी नेत्र तपासणी शिबिराचे नेहरूनगर कोर्टातील बार रूममध्ये आयोजन करण्यात आले होते.
न्यायाधीश, वकील बंधू भगिनी व न्यायालयीन कर्मचारी मिळून १२० जणांनी सहभाग घेऊन नेत्र तपासणी केली. संबंधित नेत्र तपासणी तज्ञ आणि सहकारी यांचा सन्मान चिन्ह व षुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अॅडव्होकेट बाजीराव दळवी, मा. अध्यक्ष छाजेड सर, सुनील कडुस्कर, मा. उपाध्यक्ष प्रतिक जगताप, गौरव वाळूंज, तसेच अॅडव्होकेट रामराजे भोसले, सुनील दातीर, लाळगे पाटिल, गोरख कुंभार, संतोष मोरे, रायते मॅडम, तसेच स्नेहा कांबळे, गीतावली जाधव, सविता तोडकर, जयश्री कोंद्रे, ऐश्वर्या शिरसाठ, निलम जाधव वकील बंधू भगिनी व बार असोसिएशनचे अध्यक्ष नारायण रसाळ, ऑडिटर राजेश रणपिसे, सहसचिव मंगेश नढे व सदस्य प्रशांत बचुटे, नितीन पवार व महिला सचिव प्रमिला गाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन उपाध्यक्ष ॲड.जयश्री विलास कुटे यांनी केले.













