न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२३) :- शहरातील टपाल कार्यालयांमध्ये आज सोमवारपासून (दि. ९) राष्ट्रीय टपाल आठवडा राबविला जाणार आहे. त्या अंतर्गत १३ तारखेपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. आज जागतिक टपाल दिनानिमित्त शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांना पोस्टाच्या कामकाजाची माहिती दिली. महिला बचत गटां समवेतदेखील बैठक घेण्यात येणार आहे.
मंगळवारी (दि. १०) वित्तीय सशक्तता दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी महिला सन्मान योजनेतील ३ जुन्या खातेदार महिला, सुकन्या समृद्धी योजनेतील ३ खातेदार मुलींचा सत्कार केला जाईल. चिंचवडस्टेशन, चिंचवडगाव, पिंपरी, पिंपरी कॉलनी येथील टपाल कार्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
बुधवारी (दि. ११) पत्रव्यवहार दिन साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम पुणे येथील मुख्य टपाल कार्यालयात होणार आहे. गुरुवारी (दि. १२) पत्र आणि पार्सल दिवस साजरा होईल. उत्तम सेवा देणाऱ्या ३ पोस्टमनचा सत्कार करण्यात येणार आहे.













