- शहरातील सर्व नाट्यगृहांचे स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिटचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२३) :- महापालिकेचे शहरात पाच नाट्यगृह आहेत. त्या सर्व नाट्यगृहांचे बांधकामविषयक स्ट्रक्चरल, विद्युत आणि फायर ऑडिट करण्यात येणार आहे. तसे, निर्देश क्रीडा विभागाने स्थापत्य, विद्युत आणि अग्रिशमन विभागास दिले आहेत.
महापालिकेचे चिंचवड येथे प्रा. मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथे आचार्य अत्रे रंगमंदिर, भोसरीत कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवीत निळू फुले रंगमंदिर, आकुर्डीत ग. दि. माडगुळकर नाट्यगृह असे पाच नाट्यगृह आहेत. नाट्यगृहात विविध कार्यक्रम नाटक आदींसाठी शेकडो नागरिक उपस्थित राहतात. त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे.
कासारवाडी येथील डॉ. आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅसची गळती होऊन १९ जणांना बाधा झाली होती. त्या दुर्घटनेमुळे नागरिकांच्या जिवीताचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे क्रीडा विभागाने नाट्यगृहांचेही ऑडिटचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्ट्रक्चरल ऑडिट विद्युतपुरवठा व जोडणीचे ऑडिट आणि आग प्रतिबंधक उपाययोजनेबाबतचे ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थापत्य, विद्युत आणि अग्रिमशन विभागास क्रीडा विभागाने कळविले आहे.


















