न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२३) :- मैत्रीण आणि पत्नीसोबत फिर्यादी हे पाषाण येथील पंजाबिझ हॉटेल येथे शनिवारी (दि. १४) रात्री पावणे दहाच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करण्यापूर्वी ते हॉटेलमधील स्मोकिंग झोनमध्ये सिगारेट पिण्यासाठी गेले. त्यावेळी तिथे लहान मुले खेळत होती. त्यामुळे फिर्यादी यांनी वेटरला आवाज देऊन लहान मुलांना बाहेर पाठवले.
त्यानुसार वेटरने लहान मुलांना खाली पाठवले. त्यानंतर मुलांचे पालक तेथे आले. त्यांच्या मुलांना खाली पाठवल्याने त्यांना राग आला. त्या रागातून त्यांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांची पत्नी भांडण सोडविण्यासाठी आली असता त्यांना धक्का दिला. फिर्यादीच्या मैत्रिणीला शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या मित्राच्या डोक्यात काहीतरी फेकून मारून दुखापत केली. ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकीही फिर्यादी यांना दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
निरंजन संजीवन हर्षे (४२, रा. औंध, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्नील शंकर बिराजदार (४०, रा. वाकड), श्लोक सुदेश होणराव (२७, रा. वडगाव, पुणे), सिद्धार्थ संतोष होणराव (३६, रा. गुलटेकडी), सम्राट सतीश होणराव (३४, रा. गुलटेकडी), शंतनू संदीप होणराव (३१, रा. स्वारगेट) यांच्यासह इतर दोन अनोळखी इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


















