न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे प्रतिनिधी : गणेश विसर्जनावेळी पुण्यातील एका नगरसेवकाने व त्याच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती आरूढ झालेल्या एका वाहनावर हल्ला केला तसेच गणेशमूर्तीची विटंबना केली.
रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास भवानी पेठेतील कासेवाडीमधील अशोक तरूण मंडळाची मिरवणूक जात होती त्यावेळी हा प्रकार घडला
यावेळी खडक येथील पोलिसांनी नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात आरोपींनी कोळी आणि म्हस्के यांना मारहाण करून साउंड सिस्टीम व वाहनाचे नुकसान केले तसेच गणेश मूर्तीची विटंबना केली.