न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी :- रविवारी (दि. २३) रोजी भोसरी येथे वाळके मळ्याजवळ एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करून त्याचा मृतदेह फेकून देण्याची घटना उघडकीस आली.
अद्याप या तरुणाची ओळख पटलेली नसून मृत तरुणाचे वय अंदाजे २५ वर्ष आहे. त्याने अंगात बर्मुडा परिधान केला असून शरीरावर ठिकठिकाणी वार केल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गाडे करत आहेत.