न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी :- निगडी येथे एका मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला बेकायदेशीरपणे पिस्तूल पुरवताना रावण साम्राज्य टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसानी सापळा रचून अटक केली.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने हि कारवाई केली असून गुन्हेगारांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 51 हजारांचा माल जप्त केला आहे. अटकेतील गुन्हेगारांवर अनेक गंभीर स्वरुपाची गुन्हे दाखल असून पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढण्यात हे गुन्हेगार पटाईत होते.
या दोन गुन्हेगारांची नावे ऋतिक रतन रोकडे, वय १९, रा. चिंतामणी नगर, चिखली, सचिन दीपक लोखंडे वय २१, रा. भाऊसाहेब रोकडे चाळ. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे समाजात कौतुक होत आहे.