न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई :- भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘खोटेपणाचा’ आरोप केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस सोबतच्या आघाडीबाबत बोलताना राष्ट्रवादी पक्ष हा धर्म निरपेक्ष नाही असे वक्तव्य केले होते, याला प्रतिउत्तर देताना शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना निवडून येण्यासाठी मदत केली होती असा दावा केला होता. पवारांनी केलेल्या या दाव्याला आता आंबेडकरांनी ‘खोटे’ ठरवले आहे.
याविषयी बोलताना आंबेडकर म्हणाले की “१९९७-९८ सालच्या निवडणुकांमध्ये मी काँग्रेस सोबत आघाडी केली होती, मात्र ही आघाडी करताना माझा संपर्क थेट तेव्हाचे काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी झाला होता. तेव्हा पवार देखील काँग्रेसमध्येच होते मात्र त्यांचा या आघाडीमध्ये कोणताही वाटा नाही.”