न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२४) :- निगडी प्राधिकरण येथील काचघर चौकात ७५ वा प्रजासत्ताक दिन गरवी गुजराथी समाज यांच्या वतीने उत्साहात पार पडला. ध्वजारोहन ज्येष्ठ नागरीक चंद्रकांत बहिरट यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त गरवी गुजराथी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, माजी महापौर कुमार आर.एस, माजी उपमहापौर शैलजा मोरे, जीगर व्यास, जयश्री मखवाना, किशोर मखवाना, सुहास जोशी, मनोज देशमुख, विजय शिनकर, राजेंद्र बाबर, अण्णा अभंग, तुकाराम काळभोर, सुर्यकांत मुथियान आदी मान्यवरांनी ध्वजारोहन प्रसंगी उपस्थित राहून मानवंदना दिली.