न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२४) :- ‘संविधान गुण गौरव परीक्षा २०२३’ या परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना शहरातील सारनाथ बुद्ध विहार येथे नुकतेच बक्षिसांचे वाटप करण्यात आले. रक्षित सामाजिक संस्था, म्हसळे यांच्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
न्यू सिटी प्राईड शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. लहान गटात पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांना गोल्डन मेडल्स, पेन व प्रमाणपत्र तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पेन व प्रमाणपत्र देण्यात आले. मोठ्या गटात कल्पना हालु व ज्योस्त्ना भालेराव व शोभा सैंदाणे यांच्या हस्ते महिला भगिनींना बक्षीस वाटप करण्यात आले.