- पोलीस मारेकऱ्याच्या शोधात; हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२४) :- मोशी येथील कचरा डेपा समोरील मोकळया मैदानात अज्ञात कारणावरुन २४ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. तरुणाच्या चेह-यावर व डोक्यात दगडाने मारुन त्याला गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला आहे.
अमोल पवार असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना (दि. ५) रोजी दुपारी ०१:०० ते ०१:३० च्या दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात ६५/२०२४ भा.दं.वि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सपोनि पठारे हे घटनेचा पुढील तपास करीत आहेत.















