न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) :- केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्याने आज पिंपरी- चिंचवडमधील शरद पवार गटाने ठिकठिकाणी आंदोलन केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शरद पवार गटाने निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी करत मुंडन आंदोलन केले. आमचा पक्ष आमचं चिन्ह शरद गोविंदराव पवार अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते.
यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कुणाची आणि चिन्ह कुणाचं यावर निकाल जाहीर केला आहे.











