- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२४) :- सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बहुप्रतिक्षित आणि चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. सुहास दिवसे यांची अखेर नियुक्ती करण्यात आली. तर त्यांच्या जागी क्रीडा आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. दोन्ही अधिकारी पुण्यात होते आणि आताही बदलीनंतरही पुण्यात राहिल्याचे स्पष्ट झाले.
पुण्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांची बदलीही प्रतिक्षेत होती. त्यामुळे जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. अखेर क्रीडा आयुक्त दिवसे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांची बदली गेल्या आठवड्यापासून प्रतीक्षेत होती. अखेर राज्य सरकारने दिवसे यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केल्याचे आदेश बुधवारी सायंकाळी जारी केले.
दिवसे हे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ‘गुडबुक’मधील असल्याचे मानले जाते. दिवसे यांनी २००४ ते २००७ मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी पदी काम पाहिले आहे. त्याशिवाय त्यांची कारकिर्दही पुण्यात सुरू झाली.